पुढील कार्यक्रम

Ayushyawar Bolu Kahi

नमस्कार मंडळी,

मराठी भाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आणि जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ कुवेत, कार्यकारी समिती २०२४ आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे, एक अविस्मरणीय आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम “आयुष्यावर बोलू काही”.

२० वर्षे मराठी मनांत घर केलेला आणि २००० हुन जास्त प्रयोगाचा टप्पा पार केलेला अविस्मरणीय कार्यक्रम.

गाणी, कविता आणि आठवणींची एक खास मैफिल; सादरकर्ते डॉ. सलील कुलकर्णी, श्री. संदीप खरे आणि श्री. आदित्य आठल्ये.

दिनांक : ८ मार्च २०२४ रोजी, सायंकाळी ४.०० वाजता,
स्थळ: ICSK स्कूल खेतान, कुवेत.

टीप: असेच दर्जेदार कार्यक्रम आपल्या सेवेत आणण्यासाठी सर्व सदस्यांना विनंती आहे कि आपले सदस्यत्व नोंदवून घ्या.

धन्यवाद !
महाराष्ट्र मंडळ, कुवेत
कार्यकारी समिती २०२४

Recent Event

बॅडमिंटन स्पर्धा २०२४.

बॅडमिंटन कौशल्य विकास, आरोग्य, मनोरंजन आणि सांघिक कार्याच्या भावनेला चालना देण्यासाठी बॅडमिंटन सामने खेळवले गेले.

वार्षिक सहल २०२३

महाराष्ट्र मंडळ सहल २०२३ मध्ये आपण सर्वांनी धमाल, मस्ती आणि मज्जा हि अनुभवली.

शिवजयंती उत्सव

महाराष्ट्र मंडळ कुवेतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

क्रिकेट सामने आयोजन

महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांमध्ये उत्साहवर्धक क्रिकेट सामने आयोजित केले.

फुलराणी चित्रपट

"फुलराणी" चित्रपट महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला.

हसू , गाऊ आणि नाचू

महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवार, १९ मे २०२३ रोजी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.