President Message

मंडळाच्या २०२३ साठीच्या कार्यक्रमांबद्दल माझी मते 

१. सभासद संख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपाय
२. सभासदांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक उपाय
३. मंडळाच्या घटनेत नमूद केलेल्या  उद्दिष्टांना समोर ठेऊन कार्यक्रमांची निवड
४. प्रायोजक आणि दुतावास यांच्याशी संवाद ठेऊन आवश्यक उपाय योजना

मंडळाची सभासद संख्या वाढविणे हे २०२३ चे एक सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. वेबसाईट, इमेल, एसेमेस आणि शक्य झाल्यास व्यक्तिश: भेट याद्वारेजनसंपर्क वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच आपल्या मित्र् परीवाराना सभासद बनवून घेण्यासाठीप्रयत्न करावा अशी सर्व सभासदांना विनंती आहे.तसेच नव्याने सभासद झालेल्या कुटुंबांना एकाकी वाटू नये व त्यांना कुटुंबात लवकर कसे सामावून घेता येईल याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

सभासदांचा कार्यक्रमांच्या आयोजनातील सहभाग वाढला तरच कार्यकारी समिती व सभासद यांच्यातील दरी कमी होईल. मंडळाच्या प्रत्येक  कार्यक्रम/उपक्रम आयोजनात  निवडक/इच्छुक सभासदांना स्वयंसेवक म्हणून सामावून घेता येऊ शकेल. तसेच काही अनुभवी आणि जुन्या सभासदानाही काहीनिवडक उपक्रमात सामावून घेता येऊ शकेल–जसे एखाद्या नवीन उपक्रमाचे आयोजन, वेब साईटकंटेंट तयार करणे, वार्षिक कार्यक्रमासाठी काही नाविन्यपूर्ण सादर करण्याचीजबाबदारी (उदा- एकांकिका बसवणे  किंवा काही  म्युसीकॅल कार्यक्रमतयार करणे). आणि स्मरणिकेसाठी व वेब साईट साठी जाहिराती मिळवण्यासाठी इत्यादी.

कार्यक्रमाचीनिवड करतांना “करमणूक” हा निकष असतोच, परंतु प्रतिभावंत/ सृजनशीलकलाकारांना प्राधान्य द्यावे. करमणुकी सोबतच सांस्कृतिक, सामाजिक , शैक्षणिक उद्बोधन होईल व मराठी भाषा आणि संस्कृतीची  जपणूक होईल असेकार्यक्रम आयोजित व्हावेत.

प्रायोजकांच्या मंडळाकडून असलेल्याअपेक्षा लक्षात घेऊन त्यांनुसार त्यांच्याशी चर्चा करून काही ठोस पावलेउचलावीत जेणेकरून दोघानाही त्याचा फायदा होईल. केलेल्या कामाची जाहिरातकरणे हे ही महत्वाचे अंग आहे. त्यामुळे वेळेवर रिपोर्ट बनवून छापून आणणेजरुरी आहे.

दुतावासासोबत नियमित संवाद ठेवणे  तेवढेच महत्वाचे आहे, सर्व सर्क्युलर्स वेब साईट वर उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे “सौजन्य” …

मला खात्री आहे आपण आपल्या प्रयत्नात यशस्वी होऊ.

धन्यवाद!

रवींद्र पाटील

अध्यक्ष,

महाराष्ट्र मंडळ कुवेत 

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *