हर दिलाची एक बोली
मी मराठी, मी मराठी
रुजवू मराठी, फुलवू मराठी
ह्या कुवेती वाळवंटी
रुजवू हिरवळ, ही मराठी
आसमंती गर्द काळ्या
चांदणे फुलवू मराठी
सोडुनी आलो जरी प्रिय
मातृभूमी आपुली
दूरदेशी तरीही आपण
जगवूया अपुली मराठी
लीन होऊन आज वंदू
मायभूमी आपुली
पांग फेडू याच जन्मी
जिंकवू अपुली मराठी
गीत : जयश्री अंबासकर, संगीत : विवेक काजरेकर, गायक : विवेक, जयश्री, साल : २००६